राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संगणक कौशल्य अभियानाचे प्रदेशक्षांकडून कौतुक
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांच्या संकल्पनेतून संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिशा कॉम्प्युटरच्या संयुक्त विद्यमाने संगणक कौशल्य अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाचे शुभारंभ खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले होते.
या अभियानाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात कॉम्प्युटर कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेतला.
रत्नागिरी जिल्हा मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काम उत्तम चालू असल्याची माहिती आमदार श्री. शेखर निकम व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांना दिली. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे श्री जयंतराव पाटील यांनी कौतुन करून शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment