ट्विटमध्ये काय म्हणाले आदर पुनावाला.....
जगभरात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. काही भागात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढत आहे. यादरम्यान भारताला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्विट करत दिली आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले आदर पुनावाला
''कमी किमतीत उपलब्ध होणारी कोव्हिशिल्ड लसीच्या पहिली प्रकारातील डोस कोरोनावर ९० टक्के प्रभावी ठरत आहे. तर दुसऱ्या प्रकारतील डोस ६२ टक्के प्रभावी ठरत आहे. याबाबतची विस्तृत माहिती संध्याकाळी देण्यात येईल.” असे आदर पुनावाला यांनी म्हटले आहे. यासोबतच या लसीचे वितरणदेखील लवकरच सुरु होईल अशी दिलासादायक माहितीदेखील पुनावाला यांनी दिली आहे.
‘कोव्हिशिल्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत होण्यास सुरुवात होईल. या लसीची किंमत ५०० ते ६०० रूपये इतकी असेल. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Post a Comment