लाभांश मंजुरीचा अधिकार संचालक मंडळाला देणारा अध्यादेश पारित

 


दि.०२ नोव्हेंबर २०२० रोजी महा.सह.कायदा कलम ६५, कलम ७५ (२ ब), कलम ८१ मध्ये आवश्यक बदल करणारा अध्यादेश मंजूर झाला. त्यामुळे वार्षिक सभा घेण्यापूर्वी नफा वाटणीचा अधिकार संचालक मंडळाला देण्यात आला असल्याने आता संचालक मंडळ नफा विभागणी कायद्यातील व पोटनियमातील तरतुदीनुसार करू शकेल. लाभांश देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय या वर्षासाठी संचालक मंडळाला देण्यात आला आहे. अशी माहिती अॅड.दीपक पटवर्धन यांनी दिली.

लाभांश जाहीर करणे, गंगाजळीत रक्कम वर्ग करणे, विविध निधीमध्ये रक्कमा वर्ग करणे हे अधिकार नव्या अध्यादेशाने संचालक मंडळाला प्राप्त झाले आहेत. चालू वर्षासाठी लेखा परीक्षक नियुक्तीचा अधिकार ही संचालक मंडळाल देण्यात आला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी दि ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी चा अध्यादेश दि.२८ ऑक्टोबर २०२० रोजी मंजूर झाला. त्यामुळे आता वार्षिक सभेपूर्वी नफ्याची वाटणी करून लाभांश वितरीत करण्याबाबत निर्णय संचालक मंडळ, संचालक मंडळाच्या बैठकीत घेवून लाभांश वितरीत होवू शकणार आहे. 

दिवाळीपूर्वी भागधारकांना लाभांश वितरीत करण्याचा मार्ग या अध्यादेशाने मोकळा झाला असून सातत्याने राज्य शासनाकडे या संदर्भाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले अशी माहिती अॅड.दीपक पटवर्धन राज्य पतसंस्था फेडरेशनचे तज्ञ संचालक यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Comments