दिपावली निमित्त घेण्यात आलेल्या 'सेल्फी विथ आकाशकंदील' स्पर्धेचा निकाल अखेर जाहीर

 देवरूख : प्रतिनिधी 

शहर भागात मर्यादित स्वरुपात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपावली निमित्त 'selfie with आकाशकंदील' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला संगमेश्वर वासियांनी उत्तम प्रतिसाद देत आकाशकंदीलासोबत सेल्फी काढून दिलेल्या whatsapp क्रमांकावर पाठवल्या.आलेल्या सर्व selfie परीक्षणासाठी दिल्या असता परीक्षकांनी सर्वच उत्तम असल्याचा निर्वाळा देत प्रथम तीन क्रमांकांची निवड केली. या स्पर्धेत कु. साई  नारकर याने प्रथम क्रमांक पटकावला. 

             या निकालाविषयी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. हरीभाई पटेल म्हणाले दिवाळीत चैतन्य, उत्साहाचे प्रतिक म्हणुन आपण दिवे लावतो तसेच अंधाराकडून तेजाकडे जाण्यासाठी आपण आकाश कंदिलाचा आदर्श घेतला पाहिजे. तो स्वतः एका उंचीवर राहून त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला प्रकाश देतो व योग्य मार्ग दाखवतो. संगमेश्वर भाजपकडून समाजातील अंधार, दुःख दूर करण्याचा हा छोटा प्रयत्न. सर्धेतील विजेत्यांना त्यांची पारितोषिके समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील असे आयोजक डाॅ अमित ताठरे यांनी सांगितले. याव्यतिरिक्त सर्व स्पर्धकांच्या selfie आमचे फेसबुक  पेज  येथे पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. 

              प्रथम क्रमांक : कु. साई विनायक नारकर ,द्वितीय क्रमांक श्री. अभय गद्रे, तृतीय क्रमांक विभागून: श्री. अभिषेक शंकर खातू, श्री. प्रसाद सुर्वे. या स्पर्धेसाठी भारतीय जनता पक्ष द.रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री. हरीभाई पटेल,तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव,भाजप ओबीसी आघाडीचे तालुका उपाध्यक्ष श्री. अनुप प्रसादे, ओबीसी आघाडी तालुका सरचिटणीस श्री. निखिल लोध,तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम,विनोद म्हस्के, जिल्हा उपाध्यक्षा सौ. दिपिकाताई जोशी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. कोमलताई रहाटे, यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


Comments