दिलेला शब्द पुर्ण करुन लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांचे प्रयत्नातून कोंडेतड वासियांचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लावला ! ! !

 अनेक वर्षे नवीन पिण्‍याच्‍या पाण्याची टाकी व नवीन वितरण व्‍यवस्‍थेच्‍या प्रतिक्षेत असलेले कोंडेतड वासियांना तसेच जुनी जीर्ण झालेली वितरण व्‍यवस्‍था ही वारंवार फुटणे, पाणी कमी येणे, अवेळी पाणी येणे या समस्येवर अखेर पूर्णविराम मिळाला. 

             मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमिर खलिफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन नवीन पाण्याची टाकी व नवीन वितरण व्‍यवस्‍था करून कोंडेतड वासियांचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लावला.

           या कार्यामध्‍ये आरोग्‍य सभापती सौ.स्नेहा कुवेसकर, नगरसेवक श्री.आसिफ मुजावर, नगरसेवक श्री.हनिफ काझी यांचे विशेष सहकार्य लाभले.

           या नवीन टाकीतून होणा-या पाणीपुरवठा वितरणाचा शुभारंभ हे नुकतेच आपल्‍या सेवेची ३९ वर्षे सेवा बजावून पाणी समस्‍यांचे निवारण करणारे सेवानिवृत्‍त मुख्यलिपिक श्री.किशोर जाधव यांच्या हस्ते पाण्याचा वॉल फिरवून करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमिर खलिफे, आरोग्‍य सभापती सौ.स्नेहा कुवेसकर, नगरसेवक श्री.आसिफ मुजावर, नगरसेवक श्री.हनिफ काझी, विरोधी पक्षनेते श्री.विनय गुरव, नगरसेवक श्री.सौरभ खडपे, मुख्यलिपिक श्री.जितेंद्र जाधव, पाणीपुरवठा विभागाचे श्री.प्रदिप आसवेकर, श्री.शशिकांत तांबे तसेच श्री.संंजय कुवेसकर, श्री.सुरेश दुधवडकर, श्री. मोहन दुधवडकर आदी उपस्थित होते. लॉकडाऊनचे काळामध्‍ये समस्‍त कोंडेतडवासीयांनी केलेल्‍या सहकार्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमिर खलिफे यांनी आभार मानले.



Comments