भीषण दुर्घटना, रत्नागिरीत धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक कोसळला


रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये  कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रोरो रेल्वेमधून मालवाहू ट्रक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील सुकीवली गावानजीक ही घटना घडली आहे. 

कोलाडहून वेरना इथं रोरो रेल्वेनं मालवाहू ट्रक नेण्यात येत होते.  स्टीलच्या प्लेट्स भरून रोरो रेल्वेनं गोवा इथं हा ट्रक नेण्यात येत होता.मात्र, गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास धावत्या रोरो रेल्वेमधून अचानक ट्रक निसटला आणि रेल्वे रुळावर आदळला. 

ट्रक आदळल्यामुळे परिसरात मोठा आवाज झाला. प्रचंड आवाजाने नजीकच्या गावातील लोकं देखील भयभीत झाले होते. ट्रकमध्ये स्टीलच्या प्लेट असल्यामुळे आवाजाची तीव्र आणखी जास्त होती.  गावाकऱ्यांनी रेल्वे रुळावर जाऊन पाहणी केली असता ट्रक कोसळ्याची घटना समोर आली.

या भीषण दुर्घटनेत, ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ट्रकची फक्त चाकं आणि सांगडा घटनास्थळी उरला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहे. नेमकं धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक निसटला कसा? या दुर्घटनेला कारणीभूत कोण आहे? याचा तपास अधिकारी घेत आहे.



Comments