रत्नागिरी तालुक्यातील मग्रारोहयोच्या लाभार्थ्यांना लॉकडाऊन काळात तब्बल ५३ लाखांचे अनुदानाचे वितरण

 


रत्नागिरी तालुका कृषी अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत काम करणा-या लाभार्थ्यांना लॉकडाऊन काळात तब्बल ५३ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. दिनांक १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत मग्रारोहयोच्या लाभार्थ्यांनी २२३४९ एवढे मजुर दिवस पुर्ण केले. या मजुरीबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून ५३ लाख ७१ हजार ९५४ एवढी रक्कम या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 

तीन वर्षांसाठी देय असलेली रक्कम मंजूर अनुदान ५ कोटी १४ लाख ८५ हजार २९५ एवढे आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून लॉकडाऊन काळात मजुरी केलेल्या लाभार्थ्यांना मजुरी म्हणून अनुदान त्यांच्या खात्यात थेट वर्ग केल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

आत्तापर्यंत एकूण लागवड पुर्ण झालेले क्षेत्र:- २८४.२३ हेक्टर

आत्तापर्यंत आंबा फळ पिकाची लागवड पुर्ण झालेले क्षेत्र:- ६९.९३

आत्तापर्यंत काजू फळ पिकाची लागवड पुर्ण झालेले क्षेत्र:- २१३.३५ हेक्टर

आत्तापर्यंत नारळ फळ पिकाची लागवड पुर्ण झालेले क्षेत्र:- १.८८ हेक्टर

Comments