रत्नागिरीत भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर विज बिले फाडुन टाकली जनतेची पिळवणूक करणा-या महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध रत्नागिरीत भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

 वीज बिले फाडून टाकत रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. वाढीव विज बिले आल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात ऊर्जा मंत्र्यांनी विज बिले माफ होणार नाहित असे वक्तव्य केल्याने जनता संतप्त झाली. जनतेचा आवाज सरकार पर्यंत पोचवण्यासाठी भाजपाच्या वतीने सर्वत्र आंदोलन करण्यात आले. रत्नागिरितील भाजपा कार्यकर्त्यांनी विज बिले फाडून जोरदार घोषणाबाजी केली. 

या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दिपक पटवर्धन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजीव कीर, राजू भाटलेकर, राजन फाळके, नंदू चव्हाण, संकेत बापट, हर्षद घोसाळकर आदी उपस्थीत होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दिपक पटवर्धन म्हणाले की कोकणातील लोक वेळेत बिले भरतात. तरी देखील वाढीव विज बिले भरण्याची सक्ती का?, लॉकडाऊन काळात अनेकांचे उद्योग,व्यवसाय बंद होते.त्यामुळे ही बिले कशी भरणार. त्यामुळे शासनाने विज बिल माफ करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


Comments