ग्रामपंचायत पाचेरी आगर, ता. गुहागर येथील अतिसार साथीवर तात्काळ नियंत्रण
रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती बी.एस. कमलापूरकर यांनी भेट देऊन अतिसार प्रतिबंधक उपाय योजनांचा घेतला आढावा
रत्नागिरी प्रतिनिधी:-
गुहागर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली अंतर्गत मौजे पाचेरी आगर येथील भुवडवाडी , हुमणेवाडी व गुरववाडी येथे दिनांक २३ नोव्हेंबर पासुन अतिसाराचे ३६ रुग्ण आढळुण आले. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली डॉ.श्री.जांगीड यांचेकडून माहिती मिळताच जिल्हास्तरावरुन प्रा.आ.केंद्र चिखलीचे तदर्थ वैद्यकिय अधिकारी डॉ.श्री.तांबे , प्रा.आ.केंद्र हेदवीचे वैद्यकिय अधिकारी डॉ.श्री.गुंजवटे , प्रा.आ.केंद्र तळवलीचे वैद्यकिय अधिकारी डॉ.श्री.देशमुख त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी श्री.विशाल राणे -प्रा.आ.केंद्र आवलोली , श्री.अजय हळे- हेदवी, समीर हालीम - चिखली , श्री.शरद गडदे - आबलोली , श्री.वैभव गडदे - तळवली यांना साथ रोग नियंत्राणासाठी आदेशीत करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत साथग्रस्त भागात दैनंदीन सर्वेक्षण व नवीन रुग्ण शोधणे , जुन्या रुग्णांचा फॉलोअप , पाणी शुध्दीकरण, ओटी टेस्ट व आरोग्य शिक्षण इत्यादी बाबींची दक्षता घेणेबाबत त्याचप्रमाणे खालील सुचना जिल्हास्तरावरुन देण्यात आल्या . १ ) कार्यक्षेत्रातील पाणी नमुन्याचे जैविक व रासायनिक तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविणे . २ ) ग्रामपंचायतमधील टी . सी . एल . नमुना तपासणी करुन प्रमाणित करणे . ३ ) नविन रुग्णांचे शौच नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविणे . ४ ) गंभिर आजाराचे रुग्णांना प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयाकडे आवश्यकतेनुसार संदर्भित करणे. दिनांक २४.११.२०२० रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.रत्नागिरी डॉ.श्रीमती बी.एस. कमलापूरकर यांनी गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली अंतर्गत मौजे पाचेरी आगर ( ग्रा.पं . पांचेरी आगर अंगणवाडी ) येथे भेट देऊन अतिसार प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. साथ नियंत्रणासाठी आवश्यक त्या सुचना दिल्या. ग्रामपंचायत पाचेरी आगर कार्यालयाला भेट देऊन ते अधिकारी व कर्मचारी यांचा साथ नियंत्रणाच्या अनुषंगाने आढावा घेतला व मार्गदर्शक सुचना दिल्या . तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा साधनांची पहाणी करुन नळ पाणी योजनेच्या पाईप लाईनच्या लिकेज संदर्भात पहाणी करणेचे आदेश ग्रामपंचायतीला दिले.
Comments
Post a Comment