पर्यटकांची वर्दळ लाखोंची उलाढाल
रत्नागिरी: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे दर्शनासाठी खुली केल्यामुळे धार्मिक पर्यटनस्थळी दर्शनातुर भक्तांची गर्दी वाढली. प्रसिद्ध गणपतीपुळेमध्ये गेल्या दोन दिवसात आठ हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. किनारे फुलल्यामुळे परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे चेहरे खुलले आहेत. गुजरातसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीतील पर्यटकांनी हजेरी लावली. तीन दिवसात दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सुमारे पंधरा ते वीस लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

Comments
Post a Comment