बनावट पासपोर्ट तयार करून तब्बल ३० वर्षे केली परदेशवारी
खोट्या नावाने बनावट पासपोर्ट तयार करून तब्बल ३० वर्षे परदेशवारी करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शकील महम्मद इसाक डबीर (रा. उंबरघर ता. दापोली, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी रात्री ११ वा. दाभोळ सागरी पोलिस ठाण्याकडून करण्यात आली.
शकीलने इरफान मोहम्मद इसाक नाईक या खोट्या नावाने बनावट पासपोर्ट तयार केला आणि त्याद्वारे १९९० ते २०२० या ३० वर्षात अनेकवेळा सौदी अरेबिया या देशात जाण्यासाठी त्याचा वापर केला. त्यामुळे बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे शकील डबीर विरोधात इंडियन पासपोर्ट अॅक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.

Comments
Post a Comment