कसबा वायरमन मृत्यु प्रकरणी सर्वस्वी जबाबदार हे महावितरण कर्मचारीच !

 काल सांयकाळी कसबा पारकर वाडा येथे वायरमन विज जोडणी करित असता अचानक विद्यृत पुरवठा सुरु झाल्याने वायरमन डावल याचे दुर्देवी निधन झाले होते .यावेळी अज्ञात ईसमाने विजपुरवठा सुरू केल्याने वायरमन मृत्यु मूखी पडल्याची बोंब करण्यात अाली होती .मात्र या सबंधी अधिक माहीती घेतली असता ज्या कोणा अज्ञाताने विजपुरवठासुरु केला त्याबाबत थोडेसे .

     प्रत्येक ठिकाणी गावागावात रोड लाईट चालु बंद करण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत खासगी नेमणूका केल्याची माहिती मिळते तर काही ठीकाणी सामाजिक बांधिलकी म्हणुन हे काम विना मोबदला करणारेही अणेक जण अाहेत .

   कालकसबा गावचा प्रकार हाही त्यातलाच येक प्रकार म्हटला तर वावगे नाही ,मात्र असे असताना या मधे हलगर्जीपणा हा सर्वस्वी तेथील ड्युटीवर असणार्‍या कर्मचारी वर्गाचाच म्हणावा लागेल ,

    काल सोमवार ता.२३ रोजी कसबा पारकरवाडा या ठीकाणातील झाडे तोडण्यासाठी कसबा फीडरवरुन शेटडावुन घेण्यातअाला होता .सकाळी ९वाजता विज पुरवठा बंद करुन फणस व अांब्याची चार झाडे तोडण्या साठी विद्यृत वाहीणी ऊतरण्यात अाल्या होत्याा ,सांयकाळी चार वाजे पर्यंत झाडाची तोड पुर्ण करण्यात अाल्यावर विद्यृत वाहिणी जोडण्याचे काम सुरु केल्याा गेले ,सांयकाळी सहा वाजे पर्यंत जवळपास ९५% काम पुर्ण झाले व पोलवरील कनेक्शन सुरु करण्या साठी वायरमन चढला अाणि विद्यृत प्रवाह सुरु होवुन दुर्देवी घटना घडली ,येका वारमनचा प्राण गेला ,मोठे काहुर माजले प्रत्येक जण विजपुरवठा सुरु करणार्‍याच्या नावाने शिमगााकरु लागला ,काहीनी तर विज प्रवाह सुरु करणार्‍यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा म्हणुन अाग्रही मांगणी करु लागला ,सारे खापर त्या अज्ञातावर फोडुन महावितरण मोकळे झाले ,पण खरेच तो रोडलाईट सुरु करणारा ईसम  दोषी अाहे का? याचा शोध घेतला असता त्या अज्ञाताने ,अज्ञाताने म्हणन्या पेक्षा जो ठराविक वेळेला रोड लाईट सुरु करीत असे त्याने त्यावेळी स्ट्रीट लाईट सुरु करण्याचा खटका दाबला अाणि पुढील अनर्थ घडला ,त्या बिचार्‍याला माहीतही न्हवते अापण काय करतो अाहोत अाणि काय घडणार अाहे ,निव्वळ कर्तव्य भावनेतुन त्याने विजपुरवठा सुरु केला अाणि येका मनुष्याच्या मृत्युस कारणी भुत ठरला .

     वास्तविक लाईन वरती काम करताना स्विच काढुन न्यायचे असतात कींवा जेथे फिडर अाहे( ट्रान्सफार्मर) तेथे येकाला ऊभे करावयास हवे होते .मात्र असे न करता माहावितरणचे सारे कर्मचारी यावेळी कोठे होते , स्विच का काढले न्हवते , सबंधीत इसमास विजपुरवठा सुरु करु नको यांची कल्पना का देण्यात अाली नाहि याची पोलिसांमार्फत रितसर चौकशी व्हायला पाहीजे अाणि हलगर्जी पणा करणार्‍या त्या कर्मचार्‍यावर कारवाई व्हायला पाहीजे ही मांगणी गरजेची असताना ज्याने विजपुरवठा सुरु केला त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मांगणी म्हणजे चोरसोडून सैन्याशाला फाशी असेच म्हणावे लागेल ,

     महावितरणच्या भोंगळ कारभारा मुळे येका होतकरु वायरमनला जिवाला मुकावे लागले हे नाकारुन चालणार नाही ,त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर कसबा महावितरण कर्मचारी वर्गाविरुध्द करावा अशीच मांगणी करावी लागेल .


    पत्रकार— सत्यवान विचारे ,संगमेश्वर .

Comments