महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर पांडुरंग चव्हाण यांच्याकडून चिपळूण पोलिसांसाठी मास्क उपलब्ध

 शिरगाव  (प्रतिनिधी): काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण  यांचे बंधू महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर पांडुरंग चव्हाण यांच्या सहकार्याने चिपळूण पोलिसांना नुकतेच मास्कचे वाटप करण्यात आले.   या उपक्रमाचे येथील पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.


कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीपासून पोलिसांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली आहे. यामुळे पोलिसांना आरोग्याच्या दृष्टीने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर पांडुरंग चव्हाण यांनी चिपळूण पोलिसांना मास्क उपलब्ध करून दिले आहेत. याचे वितरण महादेव चव्हाण, सुयोग चव्हाण व विलास चव्हाण यांनी केले. 


यावेळी पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, समद बेग आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते


Comments