कुवे येथे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याला अटक


लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे निवळेवाडी येथे घराच्या बाजूला बांधाच्या आडोशाला हातभट्टीची दारू बेकायदा आणि विनापरवाना विक्री करताना मुरलीधर निवळे (वय 57) यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरी ने कारवाई करत ताब्यात घेतले. कारवाईत 3720 रूपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. दारूबंदी कायदा कलम 65(ई) नुसार मुरलीधर निवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments