रत्नागिरीतील पांढरा समुद्र ते मत्स्य विभागापर्यंत सुरु असलेल्या भूमिगत विजवाहिनीच्या खोदाईत बैलाचा मृत्यू
महावितरण कंपनीच्या वतीने रत्नागिरीतील पांढरा समुद्र ते मत्स्य विभाग या दरम्यान भूमिगत विज वाहिनीच्या कामासाठी खोदाईचे काम सुरु आहे. मात्र या ठिकाणी कुठलिही सुरक्षा व्यवस्था नाहिये. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी बैल पडून त्या बैलाचा मृत्यू झाला. दोन दिवस हा मेलेला बैल तसाच त्या खडड़यात पडून होता.
मात्र कुणीही त्याकडे लक्ष दिलेले नाही. दोन दिवसानंतर हा मेलेला बैल अचानक गायब झाला. संबंधित विभागाने याकडे जातिनिशी लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment