अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने रंगभूमी दिन साजरा


सालाबाद प्रमाणे  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने  रंगभूमी सायंकाळी ७.०० वाजता  साई मंगल कार्यालय रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला  या प्रसंगी नटराज पूजन  तसेच. लॉक डाऊन नंतरची रंगभूमी,५०% क्षमते मध्ये नाट्यप्रयोग सादरीकरणाची आर्थिक गणिते या विषयावर चर्चा करण्यात आली.

तसेच प्रा. श्री आनंदजी आंबेकर यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे समाजशास्त्र विभागाच्या रत्नागिरी  जिल्ह्यातील परिचारिकांची भूमिका या विषयाच्या अध्ययनासाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. या गौरावास्पद उपलब्धी निमित्ताने प्रा. श्री.आनंद आंबेकर यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने  जाहीर सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात आपल्या रत्नागिरीच्या रंगकर्मी परिवारातील कै. लहूजी घाणेकर,कै. किशोरजी सावंत, तसेच छायाचित्रकार कै.संजू साळवी जी.तसेच महाराष्ट्रातील ज्ञात अज्ञात करोनाने हिराऊन घेतलेल्या रंगकर्मी बांधवांना अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

आज रंगभूमी दिनाच्याच दिवशी नाट्यपरिषद परिवारातील श्री.श्याम मगदूम यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवसही सर्व मान्यवरांनी साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री आनंदजी आंबेकर यांनी प्रबंधामगाची नऊ वर्षांची निर्मिती आणि अभ्यास प्रक्रिया विशद करत असताना.नाट्यपरिषदे सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.आणि आभार व्यक्त केले.

या प्रसंगी श्री. सतीजशजी दळी,श्री.सुधाकरजी बेहेरे,श्री.विजयजी पोकळे, श्री.प्रफुल्लजी घाग,श्री.शेखरजी जोशी,श्री.सुहासजी साळवी श्री. मिलिंदजी शेट्ये,श्री.श्याम मगदूम, श्री.सनातन रेडीज,श्री.आनंदजी आंबेकर, श्री.अमेय धोपटकर, सौ.अर्चना जोशी आणि श्री.समीर इंदुलकर कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी नियामक मंडळ सदस्य मध्यवर्ती आदी रंगकर्मी उपस्थित होते. नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याच्या शासन निर्णयाचे सर्वानीच स्वागत केले.

Comments