धार्मिक स्थळांमधील कर्मचार्‍यांना कोरोनाची तपासणी करावी लागणार

 रत्नागिरी:धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, देवस्थानचे विश्‍वस्त आदींना कोरोना विषाणूंची तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा सुधारित आदेश जाहीर केला आहे.पावस, गणपतीपुळे, मार्लेश्‍वर, भगवान परशुराम आदी तीर्थक्षेत्र परिसराला भेट देणारे पर्यटक, भाविक यांची संख्या गेल्या चार दिवसात झपाट्याने वाढली आहे. धार्मिक स्थळांमधील कर्मचार्‍यांचा या सर्वांशी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या संपर्क येत आहे. धार्मिक स्थळांच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी जाणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी देखील आपली कोरोना विषाणूच्या तपासणी करून घ्यावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments