मास्क न वापरणाऱ्यांवर गुहागर नगरपंचायतीची दंडात्मक कारवाई

 मास्क न वापरणाऱ्यांवर गुहागर नगरपंचायतीची दंडात्मक कारवाई

गुहागर: येथील नगरपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारी दिवसभरात 16 व्यक्तींकडून दंडापोटी 8 हजार रुपयांची वसुली नगरपंचायतीने केली. गेल्या सहा महिन्यात नगरपंचायतीने 44 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून 22 हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

Comments