राष्ट्रीय सेवा समितीतर्फे रत्नागिरीत संविधान दिन अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न

 ●रत्नागिरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचे 35 अ व 370 कलम मोडीत काढल्याने काश्मीरने मोकळा श्‍वास घेतला आणि अतिरेकी कारयावा थांबल्या, काश्मिरी व डोग्रा पंडितांना न्याय मिळाला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि साहित्यिक अ‍ॅड. विलास पाटणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले. राष्ट्रीय सेवा समितीने झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनातील श्रीमान पांडुरंग वैद्य सभागृहात संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


●या वेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संघचालक आनंद मराठे, राष्ट्रीय सेवा समिती अध्यक्ष संतोष पावरी उपस्थित होते.


●अ‍ॅड. पाटणे म्हणाले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेचा नागरिकांचे स्वातंत्र्य हा प्राण आहे. तसेच न्यायालयांचे स्वातंत्र्य आपण प्रतिष्ठेने जपले पाहिजे. जीवन आणि स्वातंत्र्य कायद्याचा मूळ आधार आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षेचे प्रतिक असलेली राज्यघटना प्राणपणाने जपली पाहिजे. घटनेने दिलेले मूलभूत अधिकार, पैसा, भाषा, जात, पद यामुळे जाता कामा नयेत. प्रामाणिक, चारित्र्यवान लोकांनी घटनेचे पावित्र्य सांभाळले तर देशाची लोकशाही बळकट होईल.


●कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रशांत पाध्ये यांनी केले. दीपप्रज्वलन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतमाता, संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. मोहन भिडे यांनी पद्य सादर केले. राष्ट्रीय सेवा समिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. संविधान उद्देशिकेचे वाचन राजेश आयरे यांनी केले.


●या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकर्ते मोहनराव भावे,भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा सचिव राजू भाटलेकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्‍वर्या जठार,  जिल्हा सरचिटणीस शिल्पा मराठे,नगरसेविका सुप्रिया रसाळ,  रत्नागिरी शहराध्यक्षा सौ.राजश्री शिवलकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन,ओ. बी.सी. महिला जिल्हाध्यक्षा,सौ.प्राजक्ता रुमडे, राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रांत संपर्क प्रमुख सौ.उमाताई दांडेकर, शहराध्यक्षा सौ.मीरा भिडे ,अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.भाऊ शेट्ये, उपाध्यक्षा,अ‍ॅड.सौ.प्रिया लोवलेकर,सचिव अ‍ॅड.सचिन रेमणे, कोषाध्यक्ष अ‍ॅड.संदेश शहाणेर. विहिप चे जिल्हा मंत्री वल्लभ केनवडेकर,प्रखंड मंत्री दीपक जोशी, र.ए. सोसायटीचे कार्यवाह सतिश शेवडे, सह कार्यवाह नथुराम देवळेकर,नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, महर्षि कर्वे स्री शिक्षण संस्थेचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य मंदार सावंतदेसाई, क्रीडा भारती प्रांत कार्यकर्ते विश्वनाथ बापट,

संस्कृत भारती जिल्हा कार्यकर्ते अ‍ॅड.आशिष आठवले,संस्कार भारती शहर कार्यकर्त्या सौ.पर्णीका मुळ्ये,

खारवी समाज पतसंस्थेचे संचालक सुधीर वासावे, भंडारी समाज रत्नागिरी समाज तालुका सचिव प्रविण रुमडे,कोकण ग्रीन पॉवर प्रायव्हेट ली.चे संचालक विनायक बंडबे

आदींसह अनेक जण उपस्थित होते.



Comments