धामणी ग्रामपंचायतीमध्ये कोविड योध्दांचा सत्कार
संगमेश्वर धामणी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना कालावधीत सेवा करणाऱ्या कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य व मा.जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मा. संतोषजी थेराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ग्रामपंचायत धामणी कार्यालयात पार पडला.
कोरोना कालावधीत सेवा करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच इतरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संगमेश्वर देवरुख पंचायत समिती सभापती सुजित महाडीक जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड प्रशासक रमेश जाधव सरपंच दक्षता पवार तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र बांबाडे पोलीस पाटील पाध्ये उद्योजक प्रभाकर घाणेकर सर्व माजी सदस्य पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment