नागरीकांना भडकवण्यासाठी विरोधकांनी खोटी वक्तव्य करु नयेत

 


रत्नागिरीतील नागरिकांना भडकवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेवर खोटे आरोप करू नये. रत्नागिरी नगर परिषद नळपाणी योजनेच्या संदर्भात कोणतेही काम चुकीचे करत असेल तर ते सिद्ध करून दाखवावे. आलिम वाडी येथील जमीन खरेदी बाबत नगर परिषदेचा निर्णय झालेला होता. मात्र या जमिनीचे मूल्यांकन टाउन प्लॅनिंग विभागाने केले. याद रत्नागिरी नगरपरिषदेचा संबंध नाही. 

ही बाब विरोधकांनी लक्षात घ्यावी असा पलटवार रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मंगळवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी अलीम वाडी जमीन खरेदी बाबत रत्नागिरी नगर परिषदेवर आरोप केले होते. या आरोपांचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी खंडन केले आहे.

रत्नागिरी शहरातील आलिम वाडी येथील जमीन रत्नागिरी नगरपरिषदेने खरेदी करावी असा ठराव सभेमध्ये झालेला होता. मात्र ही जमीन किती रुपयांना खरेदी करावी याबाबतचे निर्देश टाऊन प्लॅनिंग विभाग देते. जमिनीचे मूल्यांकन करण्याचे काम देखील हाच विभाग करत असते. 

नळपाणी योजनेच्या माध्यमातून पंधरामाड तसेच खडक मोहल्ला या परिसरात जागा उपलब्ध न झाल्यामुळे पाण्याची टाकी उभारणीसाठी जमिनीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे खाजगी व्यक्ती कडून जमीन खरेदी करण्याबाबत ठराव नगरपरिषद सभेमध्ये करण्यात आला. 

अलीम वाडी येथे ये जमीन उपलब्ध झाली. मात्र ती जमीन किती रुपयांना खरेदी करावी यासाठी जमिनीचे मूल्यांकन करण्याचे अधिकार टाऊन प्लॅनिंग विभागाचे आहेत अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Comments