रत्नागिरीतील खेडशी नॅनो सिटी येथे घरफोडया करणाऱ्या स-हाईत चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक


दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी १२.३० ते १७.०० वा. चे दरम्याने खेडशी नॅनो सिटी येथे राहणाऱ्या सौ. श्रुती लांजेकर यांच्या बंद प्लॅटमधून सुमारे रु. २,२७,००० किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. त्या अनुषंगाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं ११९/२०२०,भादविस कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देवुन तपासास सुरुवात केली. या तपासात दिनांक ०३/११/२०२० रोजी संशीयीत आरोपीत निलेश विजय मोहीते, वय २९ वर्षे. रा. नॅनोसिटी. खेडशी, ता.रत्नागिरी या संशयितास रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले. 

त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या बॅगेतुन वर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे दोन हार, सोन्याची अंगठी, कर्णफुल, असा चोरीस गेलेला एकुण २.२७,०००/- रुपयांचा सर्व मुद्देमाल जप्त केला. 

सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने असेही कबुल केले कि, दिनांक २१/०८/२०२० ते दिनांक ०३/०९/२०२० दरम्यान खेडशी, गयाळवाडी, कापडी इन्क्लेव्ह येथे एक बंद प्लॅट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली आहे. 

याबाबतच्या चौकशीत असे दिसून आले कि या घटनेमध्ये सौ. निर्मला चौगुले यांचे वरील घरातुन सुमारे रु ५८,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी चोरी झाली होती आणि त्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं ९२/२०२०, भादविस कलम ४५४, ४५७.३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

वरील दोन्ही गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे. कोवीड-१९ अनुषंगाने असलेले निर्बध जसे शिथिल होवू लागले तसे चोरी व अन्य मालमत्तेचे गुन्हे होण्यास सुरुवात झाल्याने पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी दखल घेतली व त्याचा आढावा घेवुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रोत्साहित केले. 

या पार्श्वभुमीवर मा.पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा, पोहवा/संदिप कोलंबेकर, संजय कांबळे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, राकेश बागुल, आशिष शेलार, पोना/विजय आंबेकर, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

Comments