रत्नागिरी नळपाणी योजना पूर्ण झाल्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल म्हणूनच विरोधकांचे राजकारण सुरु आहे

 शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांची विरोधकांवर घणाघाती टीका


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी शहातील नळ पाणी योजना पूर्ण झाल्याचे श्रेय शिवसेनेला मिळणार आहे या भितिपोटी विरोधकांचे राजकारण सुरु आहे. ज्यावेळी नळपाणी योजना मंजूर झाली त्यावेळी देखील विरोधकांनी अकरा महिन्यांचा स्टे घेतला होता. त्यानंतर ठेकेदाराला काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र विरोधकांनी कितिही चुकिच्या पद्धतीने विरोध केला तरी देखील आम्ही ही नळ पाणी योजना पूर्ण करणारच असा दावा रत्नागिरी शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

रत्नागिरी आलिमवाडी येथील जमिनीच्या किंमतीवरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे. भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र या विरोधकांचा मंगळवारी शिवसेनेने देखील चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना नळपाणी योजनेला स्टे देण्यात आला होता. आता कोव्हिड मुळे देखील पुन्हा काही कामात अडथळे आले होते. आता मार्च अखेर पर्यंत ही योजना पूर्ण करायची आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला नळपाणी योजनेचे श्रेय मिळणार म्हणूनच विरोधक राजकारण करत असल्याचा पलटवार बिपीन बंदरकर यांनी केला आहे.



Comments