राजापूर-साखरी नाटे येथे खिदमत फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील खिदमत फाऊंडेशन व रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी नाटे येथे हुजरा-ए-दस्तगीर या ठिकाणी नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
खिदमत फाऊंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम नेहमीच आयोजीत केले जातात. याचा एक भाग म्हणून हे नेत्र तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते.



Comments
Post a Comment