महाराष्ट्र सैनिकांनी नागरीकांसमवेत बेस्टच्या धारावी कार्यालयात अधिक्षक मनिषा डावरे यांची भेट घेऊन समस्यांबाबत केली चर्चा
बेस्ट प्रशासनाशी निगडीत नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विभाग अध्यक्ष श्री राजेशजी शर्मा साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिकांनी नागरीकांसमवेत बेस्टच्या धारावी कार्यालयात अधिक्षक मनिषा डावरे यांची भेट घेऊन समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. नागरिकांच्या समस्या एकून त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
काही समस्यांचा जागीच निपटारा करण्यात आला तर उर्वरित समस्या लवकरच व्यक्तिश लक्ष घालत सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.यावेळी सर्वश्री माजी विभाग अध्यक्ष राजेशजी शर्मा साहेब, विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संदिपभाई तांबे, वाहतूक सेनेचे माजी विभाग संघटक जगदिशभाई जानवलकर, विवेकभाई कांबळे, मानिक शिंदे, संतोष बागडे, मंगेश ओगले व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments
Post a Comment