१ लाख पार शिवसेना सदस्य नोंदणी रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात करण्याचा निर्धार - शिवसेना उपनेते ना.श्री.उदयजी सामंत
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी व येणाऱ्या ग्राम पंचायत निवडणूकीची तयारी करण्याचा अनुषंगाने लोकप्रतिनिधी व शिवसेना प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री प्रदीपजी बोरकर, शिवसेना उपनेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत, संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि रत्नागिरी जिल्हा समन्वय शरदजी जाधव, लोकसभा महिला आघाडी संपर्क संघटक सौ नेहाताई माने, रत्नागिरी तालुका संपर्कप्रमुख श्री मंगेश साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात १ लाख हून अधिक शिवसेना सदस्य नोंदणी, विक्रम करण्याचा आज शिवसेना उपनेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना.श्री उदयजी सामंत यांनी निर्धार करून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करण्याच्या सुचना दिल्या. त्यावेळी उपस्थित जिल्हा महिला संघटक सौ.वेदाताई फडके, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा युवाधिकारी श्री विनय गांगण, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री प्रमोद शेरे, उपजिल्हा प्रमुख श्री महेश म्हाप, संजय साळवी, तालुकाप्रमुख श्री प्रदिप साळवी, शहर प्रमुख श्री बिपीन बंदरकर, जि.प.गटनेते श्री उदयजी बने, तालुका युवाधिकारी श्री तुषार साळवी, शहर युवाधिकारी श्री अभिजीत दुडे, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ विनया गावडे, महिला तालुका संघटक सौ. कांचन नागवेकर, महिला शहर संघटक सौ मनिषा बामणे, रत्नागिरीतील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, तालुका संघटक, उपतालुकाप्रमुख, शहर संघटक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, विभाग संघटक, उपविभागप्रमुख व प्रमुख सर्व शिवसेना, महिला, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment