एसटी चे विभाग नियंत्रक सुनील भोकरे व जाधव यांच्याकडे निवेदन देताना कपिल नागवेकर,दिपक राऊत, हरिष शेकासन,सचिन मालवणकर, शफाकत काद्री

 जिल्हाध्यक्ष अँड विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून मुलांना शाळेत पोचण्यासाठी काहि ठिकाणच्या बसेस अजुन चालू झाल्या नाहित त्यामुळे मुलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी जिल्हा काँग्रेस तर्फे मागणी करण्यात आली.तसेच विस दिवसा पूर्वी किल्ला, भगवती बंदर बसेस चालू कराव्यात अशी मागणी केली असताना अजुन कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तदप्रसंगि जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत,अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन,सोशल मिडिया जिल्हा प्रमुख कपिल नागवेकर, तालुका समवयक सचिन मालवणकर, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, जयसिंग राऊत, शफाकत काद्री इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते





Comments