रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील कृषी विषयक विविध समस्यांसंदर्भात खा.शरद पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली महाविकास आघाडिची बैठक संपन्न
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्यासाठी येणाऱ्या जाचक अटिंमध्ये सुधारणा करणे, पर्यटन विकास, आंबा व काजू पीक याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीला कृषिमंत्री ना. दादा भुसे, सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री ना. अस्लम शेख, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे, पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे ह्यांचेसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




Comments
Post a Comment