साखरपा शाळा क्र. १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 साखरपा शाळा क्र. १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

देवरूख : प्रतिनिधी 

नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालामध्ये जि. प केंद्र शाळा साखरपा नं.1 च्या सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. यामध्ये अनुक्रमे अथर्व पाटील, ऋषभ बने, मंदार साळवी, रेहान खान, ऋतुराज खेडेकर, रुद्र माने यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये प्रावीण्य मिळवले. ही परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आली होती. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला. 

             या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोंडगाव पंचायत समिती सदस्य जया शेठ माने, सरपंच बापूसाहेब शेट्ये, मा. सरपंच शेखर आकटे, त्रिभुवने सर, जाधव सर, साळुंखे सर उपस्थित होते. यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना श्री .उमेश डावरे व मुख्यद्यापिका सौ.दिव्या भाटकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे जया माने यांनी विद्यार्थांना अशाच प्रकारे उज्ज्वल  भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अन्य मान्यवरांनी मार्ग दर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग, शालेय विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

फोटो- साखरपा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना बापू शेट्ये सोबत जया माने, शेखर आकटे आदिंसह अन्य मान्यवर.



Comments