हक्कभंगाला राष्ट्रवादी घाबरत नाहीः संजय कदम
खासदार सुनील तटकरे यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंगाला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरत नाही तुमची तक्रार ही हक्कभंग होतच नाही त्यामुळे तुम्ही अशा पोकळ धमक्या द्यायच्या बंद करा,तुमच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाईल असा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना दिला आहे.
आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना पत्राद्वारे खासदार सुनील तटकरे यांचे कान पकडण्याची सुचना केल्याने संपुर्ण जिल्ह्यात या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे पत्र समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
याबाबत माजी आमदार संजय कदम म्हणाले की, मी आमदार असताना आमदार योगेश कदम यांचे वडील रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. तेव्हा दापोली मतदार संघात त्यांनी अनेक कामांची भुमीपुजने व उद्घाटने केली त्यावेळी मला न बोलवताच कार्यक्रम केले जात होते.
त्यावेळी योगेश कदम यांच्याकडे कोणतेच पद नव्हते पद नसतानाही त्यांचे नाव भुमीपुजन व उद्घाटनाच्या नामफलकावर लिहले जायचे हे कोणत्या नियमात बसत होते ? तेव्हा माझ्यावर अन्याय झाला नाही का? आणि मी रामदास कदम यांच्यावर कीतीवेळा हक्कभंग दाखल करायला हवा होता, पण मी ते केले नाही याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
पर्यावरण मंत्र्यांनी या हक्कभंगाची कल्पना तेव्हा नव्हती का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पर्यावरण मंत्री असतांना रामदास कदम यांनी लोटे येथील अनेक कारखान्याना उत्पादन बंदच्या नोटीस दिल्या होत्या आणि त्या लगेच मागे घेतल्या होत्या त्या पद्धतीचा योगेश कदमांचा हक्कभंग प्रस्ताव आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली.
परंतू ते म्हणाले की,आमदार कदम हे कोरोना काळात सुरवातीला दोन महिने मतदार संघात फिरकलेच नव्हते तसेच त्यांच्या कुटूंबात अनेक जण पॉजीटीव आढळले होते. त्यावेळी एखादा रूग्ण गावात मिळाला तर संपुर्ण वाडी किंवा गाव 14 दिवसासाठी कंटोनमेंट झोन केले जात होते पण जामगे गावात असे झाले नाही.
या काळात कोरोनाने अनेक रूग्णांचे निधन झाले यांनी आमदार म्हणून कोणालीही सांत्वनपर भेट दिल्याचे दिसले नाही. मतदार संघातील रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये ड्युरा ऑक्सीजन प्रणाली बसवण्यात आली त्या उद्घाटन कार्यक्रमास रितसर निमंत्रण देवूनही ते आले नाहीत.
मात्र ही प्रणाली राष्ट्रवादी ने आणली असा समज करून ते कार्यक्रमास आले नाहीत. त्यांनी लिहलेल्या पत्रात खासदारांनी रेल्वे कडे तसेच मोबाईल नेटवर्ककडे लक्ष द्यावे असे लिहले आहे त्याबद्दल ते म्हणाले की, खासदार श्री.तटकरे यांनी प्रयत्न केल्यामुळेच खेडला नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळाला.
दापोली पंचायत समितीच्या सभागृहात खासदारांनी आढावा घेताना तो कोठे घ्यावा त्याचा अधिकार त्यांना घटनेने दिला आहे तसा आढावा त्यांनी घेतला यात बिघडले कुठे? असे ते म्हणाले. माझा निवडणूकीत झालेला पराभव हा मतांच्या खरेदी विक्रितून झाल्याचे ते म्हणाले. मी आमदार असतांना तुमचे वडील तुमचे नाव प्रत्येक नामफलकावर लावत होते तेव्हा तुमच्या बाबतीत आपलं ते बाळ दुसर्याचं ते कारटं ही म्हण तुम्हाला लागू होत नाही का असा उपरोधीक टोला त्यांनी यावेळी लगावला.

Comments
Post a Comment