माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफेंनी केली अल्पसंख्यांक विद्यार्थिनी वसतीगृहाची पाहणी

 


विधान परिषदेच्या माजी आमदार व कॉंग्रेस नेत्या सौ.हुस्नबानू खलिफे यांनी शुक्रवारी रत्नागिरी थिबा पॅलेस नजिक होत असलेल्या भव्य अल्पसंख्यांक विद्यार्थिनी वसतीगृहाची पाहणी केली. राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाच्या निधी मधून विशेष प्रयत्न करुन रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांची निधी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनी वसतीगृह उभारणीसाठी मंजूर झाला होता. यासाठी सौ.हुस्नबानू खलिफे यांनी विशेष प्रयत्न केले होते. या वसतीगृहाची टोलेजंग इमारत उभारणीचे काम सध्या सुरु आहे. 

याची पाहणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसमवेत केली. यावेळी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हारीस शेकासन, शिरगाव येथील कॉंग्रेस नेते इम्तियाज मुजावर, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, कुरधुंडा येथील कार्यकर्ते कैस मालगूंडकर, कोकण नगर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते नौसिन काझी आदी उपस्थीत होते. यावेळी सौ.हुस्नबानू खलिफे यांनी संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांना सदरची इमारत उभारणी लवकरात लवकर पुर्ण झाली पाहिजे अशा सुचना दिल्या.

Comments