जयभीम मित्र मंडळ खंडाळा यांच्या वतीने आयोजित "जयभीम चषक -२०२०"
जयभीम मित्र मंडळ खंडाळा यांच्या वतीने आयोजित "जयभीम चषक -२०२०" भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरूवार दि. १९-११-२०२० रोजी माजी समाजकल्याण सभापती मा. शरदजी चव्हाण, जि.परिषदेचे माजी सदस्य मा.बाबूशेठ पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य मा. विवेकशेठ सुर्वे, वरवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.निखिल बोरकर, वरवडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मा.बबलू विचारे, मा.शेखरशेठ भडसावळे, मा.अनंतशेठ गोरे , यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या स्पर्धेचा अंतिम सामना फ्रेण्डस कोतवडे विरुद्ध गार्गी स्पोर्टस् वरवडे या संघांमधे झाला. फ्रेण्डस कोतवडे संघाने या सामन्यात विजय मिळवला. आणि "जयभीम चषक २०२०"या चषकावर आपलं नाव कोरून विजेता ठरला. मालिकावीर म्हणून उज्ज्वल पारकर, सामनावीर म्हणून सालीम कोतवडेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रमिज मुल्ला, उत्कृष्ट फलंदाज म्हणून उज्ज्वल पारकर तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पराग वारेकर यांना चषक, मेडल. व प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. तसेच विजेत्या संघास रू.१०००१ व आकर्षक चषक, उपविजेत्या संघास रू.७००१ व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. मा .विवेकशेठ सुर्वे, मा.बाबूशेठ पाटील,मा.निखिलशेठ बोरकर, मा.सुनिलशेठ पाटील, मा. अमोल बैकर, मा.रघुनाथ पिंपळे, मा. सुनीलशेठ भोजे., मा. अजयशेठ गोरे यांचे प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या स्पर्धेसाठी परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले. एस्. के. फिल्म क्रिएशनच्या सर्व कलाकारांनी यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्रीकांत जाधव, रूपेश जाधव, कैलास तांबे, भिमराज जाधव, प्रमोद तांबटकर, वारेकर, इ.नी काम पाहिलं. भविष्यात जयभीम मित्र मंडळ खंडाळा यांच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. असे मंडळाचे प्रमुख एस्.के.जाधव सर यांनी स्पष्ट केले. एस के जाधव सर यानी या पूर्वी दोन तिन शाँर्ट फिल्म तयार करुन समाज प्रबोधन केले आहे . एस के जाधव सर हे जरी शिक्षक पेक्षाचे असले तरी ते अष्टपैलू आहेत त्यांचा समाज प्रबोधनाकडे जास्त भर आहे.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते एस्.के.जाधव, दिनेश जाधव, जितेंद्र मोहिते, अतुल सावंत, सुमित कांबळे, विनू मेस्त्री, विशाल येलये, दिक्षांत जाधव, नेहाल जाधव, युवराज जाधव, प्रणय पवार, पियुष जाधव, विजय गोरे, अजय जाधव तसेच मयुरी जाधव, दामिनी जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.या सामन्यान साठी विशेष सहकार्य खानविलकर परिवाराचे कार्तिकी फार्म हाऊस खंडाळाचे मिळाले .स्पर्धेचे धावते समालोचन एस्.के.जाधव सर, सुमित कांबळे, प्रसाद गुरव यांनी केले.

Comments
Post a Comment