लॉटरी लागल्याचे सांगून आणखी एकाची फसवणूक

 रत्नागिरी: केबीसीकडून 25 लाख रुपयांची व्हॉटस्अॅप लॉटरी सोबत 96 लाखांची गाडी लागल्याची बतावणी करत तरुणीची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडली आहे. संजय शहा, ओम प्रकाश यादव, राणाप्रताप सिंग, मोहितकुमार पांडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात रेहाना मुक्तार भाटकर (३५, रा. राजिवडा, रत्नागिरी) हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार, या चार संशयितांनी वेळोवेळी त्यांना फोन करून तुम्हाला लॉटरी व गाडी लागल्याचे सांगून आपल्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरूनही लॉटरीचे पैसे प्राप्त न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत. 


Comments