उन्हवरे खाडी गाळाने साठल्याने भातशेतीचे नुकसान



गरम पाण्याचा कुंड म्हणून सुप्रसिध्द असलेले दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील कुंडा नजिकच्या खाडीत गाळ साचत आहे. त्यामुळे खाडीतील पाणी लगतच्या शेतात घुसू लागल्याने भात पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. शिवाय गरम पाण्याच्या कुंडामध्ये खारे पाणी शिरल्याने कुंडातील पाणीही खराब होत आहे.

Comments