कोरोना काळात नियम न पाळणार्या नागरिकांकडुन देवरुख नगरपंचायतीने वसुल केले चक्क ८० हजार रुपये
मार्च २०२० पासुन राज्यात कोरोना महामारीने धुमाकुळ घातला. यावेळी कोरोना रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाउन जाहीर करत कठोर नियमांची अंमलबजावणी केली तरीही बेफिकीर वागत नागरीकांनी नियम मोडले. या नियम मोडणार्या नागरीकांना देवरुख नगरपंचायत व देवरुख पोलीस स्टेशन यांनी दंडात्मक कारवाई केली. ऑक्टोबर २०२० अखेर देवरुख नगर पंचायतीने दंडात्मक कारवाई करुन चक्क ८० हजार रुपयांची वसुली केली.
मार्च २०२० पासुन राज्यात कोरोना प्रतिबंध उपाय योजनांसाठी लाॅकडाउन केले. घराबाहेर कोणी पडु नये, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करु नका अशा अनेक सुचना देवुन त्याची अंमलबजावणी करावी असे जाहीर करण्यात आले होते. तरीही बेफिकीर नागरीकांनी वाहतुकीचे व कोरोनाचे नियम न पाळता शहरात वावरण्याचे धाडस केले. या बेफिकीर नागरीकांकडुन देवरुख नगरपंचायतीने दंडात्मक कारवाईतुन ८० हजार रुपयांची वसुली केली.
यासाठी देवरुख पोलीसांचे महत्वपुर्ण योगदान लाभले. मास्क वापरणे बंधनकारक असताना नागरीक नियमांचे उल्लंघन करताना आढळले. यावेळी देवरुख नगरपंचायत कर्मचारी व देवरुख पोलीस लक्ष ठेवुन होते. नियमांची अंमलबजावणी न करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दंडात्मक वसुलीतुन देवरुख नगरपंचायतीने ८० हजार रुपयांची कमाई केली.
स्वतःसह आजुबाजुच्या लोकांचे आरोग्य सांभाळावे यासाठी गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर राखावे, मास्क वापरावे अशा साध्या सुचनांचे पालन नागरीकांनी केले नाही अशा नागरींकांना कायद्याचा बडगा दाखवत देवरुख नगरपंचायतीने दंडात्मक वसुली केली.नियम पाळणार्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Comments
Post a Comment