आरटी-पीसीआर चाचणीचे दर ४०० रुपये करा
आरटी-पीसीआर चाचणीचे दर ४०० रुपये करा
मुंबई:कोरोनाचे निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीचे दर देशभरात ४०० रुपये करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारसह राज्यांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने याबद्दल उत्तर मागितलं आहे. आरटी-पीसीआर चाचणीचे दर देशभरात ४०० रुपये करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयानं केंद्र व राज्यांना नोटीस बजावली दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या एकसमान दराबाबत पेशाने वकील असलेल्या अजय अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Comments
Post a Comment