कोकण रेल्वे मार्गावरील 'स्पेशल' गाड्या जानेवारीपर्यंत धावणार
मुंबई-सीएसएमटी ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावत असलेल्या फेस्टीवल स्पेशल गाडीला पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यासह याच मार्गावर पुढील वर्षीच्या 15 जानेवारीपर्यंत आणखी एका फेस्टीवल स्पेशल गाडीची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर (01111/01112) अशी ही संपूर्ण आरक्षित फेस्टीवल स्पेशल गाडी धावत आहे. या गाडीला आता दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 14 जानेवारी 2021 या कालाधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दररोज धावणारी ही गाडी मडगावहून सायंकाळी 6 वा. सुटून दुसर्या दिवशी सकाळी 5.50 वा. मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर पोहचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दि. 2 नोव्हेंबरपासून सीएसएमटीहून रात्री 11 वा. 5 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवेशी सकाळी 10.45 ला मडगावला पोहचेल.याचबरोबर याच मार्गावर आधीच्या मांडवी एक्स्प्रेसच्या जागेवर धावणारी फेस्टीवल स्पेशल (01114/01113) असून ही गाडी दि. 2 नोव्हेबरपासून 15 जानेवारी 21 पर्यंत रोज धावणार आहे.
मडगावहून ही गाडी सकाळी 9 वा. 15 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी 9.40 वा. ती मुंबईत सीएसएमटी स्थानकावर पोहेचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईतील सीएसएमटीहून रात्री सकाळी 7.15 वा. सुटून त्याच दिवशी ती सायंकाळी 7 वा. मडगावला पोहचेल.

Comments
Post a Comment