विल्ये हायस्कूलचे सहा.शिक्षक शिवाजी नागरवाड 'कोविड योध्दा' पुरस्काराने सन्मानित
तालुक्यातील आचार्य जावडेकर विद्यालय विल्येचे सहा.शिक्षक श्री.शिवाजी नामदेव नागरवाड (नांदेडकर ) यांना 'कोविड योध्दा ' हा पुरस्कार राजापूर-लांजा-साखरपाचे आमदार राजन साळवी यांचे हस्ते देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
पंचायत समिती राजापूर येथील किसान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जि.प.सदस्य श्री.आबा आडिवरेकर, राजापूर पंचायत समितीचे सभापती श्री.प्रकाश गुरव गटविकास अधिकारी श्री.सागर पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंखी राजापूर एस.टी.डेपोचे मॅनेजर श्री.पाथरे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.नागरवाड यांनी कोरोना लॉकडाउन काळात दि.२२ मार्च २०२० पासून पोलीसमित्र म्हणून राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल श्री.तळेकर यांच्यासोबत काम केले आहे. परराज्यातील कामगारांना सोडण्यासाठी देखील त्यांनी काम केले तसेच तहसिल कार्यालय राजापूर व ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे स्क्रीनींग सेटरवर काम केले आहे. ते विविध सामाजिक कार्यामध्येदेखील नेहमी सहभागी असतात.
विलये हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.नाईक व राजापूरचे गटशिक्षणाधिकारी श्री.अशोक सोळंखी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सदर कामकाज पाहिले. कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने पंचायत समिती राजापूर तर्फे कोविड योध्दा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .श्री.नागरवाड यांना हा पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Comments
Post a Comment