अलोरेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू

 शिरगाव ( ता चिपळूण ) : अलोरे येथील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या आशिर्वादाने  बस स्टॉपवर कोयना प्रकल्पाच्या जागेत खुलेआम अनधिकृत बांधकामे सुरू आहेत मात्र कोयना प्रकल्पाचे अ

धिकारी मूग गिळून गप्प का बसले आहेत याबाबत अलोरे तंटामुक्त समिती माजी सरपंच भाऊ मोहिते,शमशुदिन चिपळूणकर, गजानन चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे

   याबाबत सविस्तर वृत्त असे की अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या शासकीय जागेत अनधिकृत बांधकामे यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे नाकनाक्यावर बस स्टॉपवर अनधिकृत बांधकाम बस्तान बांधत आहेत आणि या सर्वमागे राष्ट्रवादीचा एका बडा नेत्याचा आशीर्वाद आहे कारण अलोरे बस स्टॉपलगत सार्वजनिक शौचालय असून त्याठिकाणी पक्के बांधकाम सुरु आहे मात्र याकडे शासकीय अधिकारी याचे दुर्लक्ष आहे

     बस स्टॉप लगत काही अंतरावर संबंधित खात्याचे अधिकारी यांचे निवासस्थान असून त्यांचे अशा अनधिकृत बांधकाम कडे का लक्ष नाही ? अधिकारी व त्या बड्या नेत्याचे साटेलोटे तर नाही ना ? असा उभा सवाल शमशुदिन चिपळूणकर यांनी उपस्थित केला आहे तर 15 ऑगस्ट दरम्यान प्रकल्पग्रस्त याना उपोषण करू नका मी लवकरच योग्य निर्णय देतो असे कोयना प्रकल्पाचे कार्य अभियंता यांनी प्रकल्पग्रस्त याना आश्वासन दिले होते मात्र अद्याप कार्य अभियंता यांनी आश्वासन याची पूर्तता केली नाही त्यामुळे लवकरच अनधिकृत बांधकामे संदर्भात उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच भाऊ मोहिते व माजी सरपंच गजानन चव्हाण यांनी दिला आहे .

Comments