राजापूर तालुक्यातील ओणी तांबळवाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार?

 राजापूर तालुक्यातील ओणी तांबळवाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार असा सवाल सध्या उपस्थीत होतोय. या भागातील अमर वारिशे यांनी हा प्रश्न उपस्थीत केला आहे. 

ओणी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. गावातील काही शिवसेनेचे पुढारी मंडळी यांनी वाडीमधील रस्ता करतो, निधी मंजूर झाला, दिवाळीत रस्ता पूर्ण होणार अशी अनेक आश्वासन प्रत्येक वर्षी देण्यात आली आहेत. मागिल तीन चार वर्षे अशाच प्रकारची आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांनी मिळून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. केवळ राजकारण म्हणून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.



Comments