युवक राष्ट्रवादीच्या तालुकास्तरीय किल्ला - कंदील स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न आमदार शेखर निकम यांच्या हस्ते बक्षीस वितरण
शिरगाव :संगमेश्वर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित तालुकास्तरीय कंदील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कामिनी कमलाकर कनावजे (देवरुख ),प्रथम यांना व सार्थक सुहास गेल्ये (तेर्ये शिवणे यांना द्वितीय क्रमांकाचे व मनाली शिंदे(देवरुख )यांच्यासह ६ जणांना उतेजनार्थ रोख रक्कम व चषक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते हा वितरण सोहळा राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी युवक जिल्हाअध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा बँक संचालक राजु सुर्वे, कला, सांस्कृतीक जिल्हा अध्यक्ष आसित रेडीज, युवक तालुका अध्यक्ष पंकज पुसाळकर, देवरुख शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर, जिल्हा बाजार समिती माजी सभापती बाळूशेठ ढवळे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, किशोर सावंत, चिपळूणचे माजी नगरसेवक मनोज जाधव, युवक विधानसभा क्षेत्राअध्यक्ष निलेश भुवड, नितीन भोसले, ग्रंथालय तालुका अध्यक्ष मंगेश बांडागळे युवती तालुका वैभवी घोसाळकर, प्रफुल्ल बाईत, मोहन पवार, संकेत खामकर अमित जाधव, जितेंद्र शेटये, देवरुख युवक शहर अध्यक्ष अमित(बंडु)जाधव, युवक तालुका उपाध्यक्ष ओमकार गायकवाड, युवक तालुका सचिव विकास राठोड,मंगेश कदम, रविंद्र गुरव, देवरुख शहर सचिव राजु वनकुन्द्रे, संतोष भडवलकर, पप्या जेठी,शार्दूल सावंत, सादिक काझी, अविराज भोपळकर, रवींद्र लाड, मोरेकाका, पायल घोसाळकर , राकेश पागार, इम्रान जेठी, यांच्यासह असंख्य कार्येकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment