ठाण्यातील तीन निरीक्षकांसह ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश
चार दिवसांपूर्वी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३५ निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी तीन निरीक्षकांसह तब्बल ३० पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी काढले आहेत. यामध्ये २७ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याही गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा काढलेल्या या आदेशात विष्णुनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची मानपाडा, बाजारपेठचे दिलीप फुलपगारे यांची कोपरी पोलीस ठाण्यात तर खडकपाडा पोलीस ठाण्याचे अंकुश बांगर यांची ठाण्याच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक तथा पोलीस आयुक्तांचे वाचक (रिडर) अजय घोसाळकर यांची गुन्हे शाखेतून कासारवडवली तर मिलिन पिंगळे यांची डायघर, कापूरबावडीचे अशोक वाघ यांची चितळसर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. याशिवाय, भिवंडीचे जमिरोद्दीन शेख (निजामपुरा), कापूरबावडीचे बाळू वंजारे (मानपाडा), कासारवडवलीचे सचिन बेंद्रे (कापूरबावडी) कोनगावचे भाऊसाहेब पवार यांची मध्यवर्ती तर नितीन सूर्यवंशी यांची शांतीनगर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे मंगेश बोरसे यांची चितळसर, मंगेश शिंदे यांची वाहतूक शाखा आणि हणमंत क्षिरसागर यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात तसेच वर्तकनगरचे ज्ञानेश्वर आव्हाड यांची श्रीनगर तर सुहास हटेकर यांची नौपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नौपाडयाचे प्रशांत आवारे यांची श्रीनगर, वागळे इस्टेटचे अमोल मोरे यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे रामदास शेंडगे आणि मानपाडयाचे मारुती आंधळे यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मानपाडयाचे दिलीप जाधव यांची कल्याण नियंत्रण कक्ष आणि बाजारपेठचे अविनाश बनवे यांची मानपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

Comments
Post a Comment