सचिन मांगले यांनी केले २ हजार कुटुंबाना सुगंधी उटण्याचे वाटप

 


संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवणचे माजी सरपंच आणि युवा सेनेचे कार्यकर्ते सचिन मांगले यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २ हजार कुटुंबाना सुगंधी उटण्याचे वाटप केले.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अनिल परब, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नजीकच्या कासारकोळवण, बोंड्ये, वांझोळे आणि साडवली गावातील ग्रामस्थांना याचे स्वतः वाटप  केले. याआधी कोरोना काळात मांगले यांनी सामाजिक बांधिलकी जपत जवळपास १ हजार कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले होते.


Comments