गावडे आंबेरे खारवी वाडा येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

 आरंभ नव्या विचारांचा..!आरंभ नव्या संकल्पनांचा..हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्यात उतरलेल्या आरंभ फौंडेशन व इंफिगो आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २५  नोव्हेंबर  रोजी कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खारवी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते सुधीरजी वासावे साहेब ,संस्थेचे सल्लागार  श्री यशवंत डोर्लेकरसाहेब, सदस्य श्री. संजय डोर्लेकर , गावडे-आंबेरेच्या सरपंच श्रीम. नम्रता आंबेरकर, आंबेरकर वाडीचे मानकरी श्री. भाऊ आंबेरकर व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. श्री.सुधीर वासावे,श्री.यशवंत डोर्लेकर, सरपंच मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या श्रीम.सुप्रिया पाटकर मॅडम व श्रीम. रुपाली  गोयनाक मॅडम यांचा शाल गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला..इंफिगोचे समन्वयक श्री.राकेश आंब्रे यांचाही शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार कण्यात आला.प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण श्री. अविनाश डोर्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार श्री.वैभव नाटेकर यांनी मानले..या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी  श्री.ओंकार खडपे, श्री.जीवन डोर्लेकर  श्री. संजय कदम, श्री.आलीम काझी यांनी मोलाचे सहकार्य केले.



Comments