शौकत भाई महाआघाडी सरकारात काँग्रेसही आहे याचा विसर नको _ अशोकराव जाधव

 संगमेश्वर : :चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणूकीत सेना राष्ट्रवादी बिनविरोध निवडणूका होण्यासाठी शौकत भाई पुढाकार घेण्याची तयारी असलेचे वाचले राज्यात सेना राष्ट्रवादीची सत्ता असलेचे त्यांचे विधान अर्धसत्य आहे राज्यात सेना , राष्ट्रवादी बरोबर सत्तेत काँग्रेसही आहे याचा विसर शौकत भाई पडून देवू नका . चिपळूण तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूका लढविण्यास काँग्रेसही सक्षम आहे वेळ पडली तर कॉंग्रेसला विश्वासात न घेतल्यास काँग्रेस आपल्या ताकतीवर निवडणूका लढवेल पण काँग्रेसला ग्रहीत धरून महाआघाडीच्या मित्र पक्षानी विधाने करु नयेत अशी विनंती काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष , प्रवक्ता रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आणि निरीक्षक चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे .

Comments