दैनिक फ्रेश न्युज चा दणका...
गेले २५ वर्षे जो रस्ता झाला नाही त्या रस्त्याला अखेर दैनिक फ्रेश न्युज च्या माध्यमातून मुहूर्त लागला.
२ दिवसांच्या मागे दैनिक फ्रेश न्युज मध्ये बातमी आल्यानंतर प्रशासनाला जाग आली.आणि नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले आज प्रशासनाकडून आश्वासन मिळाले.
शास्त्री चौक ते महात्मा फुले चौकाचा प्रश्न अखेर मार्गी
प्रभाग क्रमांक २० चे
नगरसेवक योगेंद्र दादा थोरात आणि नगरसेविका स्वाती पारधी
NJP ऑफिस मध्ये जाऊन उपअभियंता , कॉन्ट्रॅक्टर यांची मा.आयुक्त यांची बैठक घेऊन प्रश्र्न मार्गी लावला. कॉन्ट्रॅक्टर यांनी २ दिवसांत काम चालू होईल व 9 मीटरचा रस्ता 4 तारखेपर्यंत पुर्ण होईल असं आश्वासन दिले.
या मुळे नागरिकांन मध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment