डॉ. विनय नातू 'गुहागर-विजापूर महामार्गावरील खड्डे भरावेत'
'गुहागर-विजापूर महामार्गावरील खड्डे भरावेत'
गुहागर: गुहागर ते रामपूर, मिरजोळी ते चिपळूण बायपास मार्गे पिंपळी या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सुरू आहे. या रस्त्यामधील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने, रस्ता दुतर्फा झाडी वाढली असल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे व अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यामधील सर्व खड्डे त्वरित भरावे, या रस्त्यावर आवश्यक तिथे दिशादर्शक बोर्ड निर्माण करण्यात यावेत व वाहन चालकांची अपघातातून सुटका करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. एक महिन्याच्या कालावधीत या मागणीची पूर्तता न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डॉ. नातू यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment