रत्नागिरीतील अनधिकृत धंद्यावर कारवाई थांबली मात्र, कारवाईत मोठे मासे जाळ्या बाहेर
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू,मटका, जुगार सूरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध होऊन ही संबंधित विभाग साखर झोपेत असल्याचे चित्र आहेत. काही ठिकाणी कारवाई झाली मात्र भाड्याची लोक उभे करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र झालेल्या कारवाईत मोठे मासे जाळ्याच्या बाहेरच असल्याचे बोलले जातं आहे.
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा रत्नागिरी शहरासहित संपूर्ण जिल्ह्यात हें धंदे जोरदार सूरु आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा अवैध धंदे मुक्त होणार काय? असा प्रश्न आता सुजाण नागरिक विचारू लागला आहे.
रत्नागिरी शहरात काही प्रतिष्टिठ लोकांचा अनधिकृत गाळ्या मध्ये अनधिकृत धंदे सुरु असल्याची माहिती संबंधीत विभागाला असताना ही त्यां लोकांवर कारवाई करण्यास का भेदभाव केला जातोय.या लोकांचे धंदे राजरोस सुरु असून आम्ही नाय त्यातले आणि कडी घाल आतली अश्या पद्धतीने वावरत असल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी शहरात अनेक छोट्या मोठ्या टपऱ्याच्या आड खुश राहून, तसेच मारूती मंदिरच्या शिवाजी महाराज स्टेडियम जवळ, शिवसेना शाखा साळवी स्टॉप समोर, मच्छी मार्केट,अश्या अनेक ठिकाणी राजरोश धंदे सुरु आहेत. संबंधित प्रशासना कडे जर ठिकाणे माहीत असून जाणून बुजून दुर्लक्ष करत असतील तर टप्पाटप्पाने आम्ही ठिकाणे जाहीर करणार असल्याचे सांगन्याय आले आहे. त्यामुळे या धंद्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
रत्नागिरीतला एक पत्रकारच दारू, मटका धंद्याचा सेटलमन एजन्ट
रत्नागिरीमधील सुरु असणारी अवैध दारू धंद्याचा सेटलमेंट एजन्ट एक पत्रकार असल्याची चर्चा रत्नागिरी रंगू लागली आहे. या पत्रकाराची सगळीकडे चर्चा सुरु असून या धंद्यावाल्याचे हप्ते ही हाच पत्रकार जमा करतो असे बोलले जातं आहेत.हा नेमका पत्रकार कोण? याचा परदा फाश लवकर दैनिक फ्रेश न्यूज करणार आहे.

Comments
Post a Comment