रत्नागिरीत अंमली पदार्थ गांजाचे विक्री करणा-या इसमास ताब्यात घेवून त्यांच्यावर एनडीपीएस अॅक्ट अन्वये कारवाई


दिनांक ०५/११/२०२० रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मंजुरीने सापळा रचण्यात आला असता दि. ०५/११/२०२० रोजी ०१.४५ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहीत प्रमाणे रत्नागिरी ते मिरजोळे जाणारा रोडवर विमानतळ बसस्टॉप ता.जि. रत्नागिरी येथे शिवा पुजारी हा इसम रिक्षा क्र. ८७७१ ही घेवुन अंमली पदार्थगांजाचे विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहीती मिळून आल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे नेमण्यात

आलेल्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचुन एक इसम ताब्यात घेतला त्याचे नाव शिवलिंगप्पा मल्लेशी पुजारी वय 26 वर्षे रा. क्रांतीनगर झोपडपट्टी ता.जि. रत्नागिरी, असे असुन त्यांचे ताब्यात एकुण १२,०००/- रुपये किंमतीचा १.०४० कि.ग्रॅ. वजनाचा अंमली पदार्थ गांजा, तसेच गांजा विक्री करीता वापरलेली रिक्षा क्र. एम.एच०८/ ई/ ८७७१ व इतर साहीत्य असा एकुण ६४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

सदरची कामगिरी डॉ.मोहीत कुमार गर्ग पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली सदाशिव वाघमारे, उप विभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी अनिल लाड, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, सपोफौ/३५४ साळवी, सपोफौ/ १०६८ हरचकर, पोहवा/ ११६१ दिपक जाधव, पोहवा/११६२ उदय चांदणे, पोहवा/४७३ कोकरे, पोना/ १२३९ प्रविण बर्गे, पोना/१२४० राहुल घोरपडे, पोना/ ३०६ गणेश सावंत, पोना/ १३४६ विलास जाधव, चालक पोना/ १३२१ आलीम अशा पथकाने सहभाग घेवून केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोउनि/ गुणाजी सकपाळ रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Comments