राजापूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम संपन्न
स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार जनसामान्यांत या अभियानाची जनजागृती होण्यासाठी राजापूर नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिनांक 12 नोव्हेंबर रोजी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत चित्रकला स्पर्धा, 24 नोव्हेंबर रोजी माझी वसुंधरा अभियानाची बैठक घेण्यात आली. त्याचप्रमाणे 25 नोव्हेंबर रोजी सोशल डीस्टंसिंगचे पालन करुन पथनाट्य राबवण्यात आले. हे कार्यक्रम राजापूरचे नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमासाठी आरोग्य सभापती सौ.स्नेहा कुवेसकर, नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी स्वच्छतेच्या अनुशंगाने मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजापूर नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, अनुष्का जुवेकर, सिद्धेश औंधकर, संदेश जाधव आदी कर्मचारी उपस्थीत होते.


Comments
Post a Comment